कविता : 🌷’ स्त्री-जन्मा-ही-तुझीच-कहाणी ‘

कविता : 🌷’स्त्री-जन्मा-ही-तुझीच-कहाणी !’

कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : ८ मार्च २०२३
वेळ : १ वाजून २६ मि.
“अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा” 
“पंच कन्याम् स्मरेन्नित्यं महापातक नाशनम्” 
ब्रह्म-पुराणामधे स्त्रीच्या पाप-नाशनासाठी हा मंत्र आहे खास
अनादि-अनंतकालापासून अन्याय-अत्याचार-शोषणादि त्रास,
मुकाट्याने सोसून मानसीक छळ, बदनामी व कष्टप्रद वनवास, 
गौण, दुय्यम-स्थानीय-वागवणूक आणि वर सक्तीचा एकांतवास !
प्रत्यक्षात अपराधी नसताना ‘पापी-अपराधी-ठरवून’ अवहेलना,
आज मात्र त्यांच्या नावांचा मंत्र जपतात, करण्या पाप-नाशना !
देव जाणे, स्त्रीनं कशा सहन केल्या मानसीक-शारिरीक यातना
आज विचार कर-करुनही नाही येणार त्याची सुतराम कल्पना !
त्याकाळच्या पुरुष-प्रधान-संस्कृतीची ही विपरीत विचार-सरणी,
शाप-उ:शाप-अपमान-उपेक्षा-कलंकादि भडीमारानं केविलवाणी,
आंतरिक सहनशक्ती, कणखर वृत्ती व अविरत जिद्द लावून पणी,
युगानु-युगांपासून चालत आलेली स्त्री-जन्मा-ही-तुझीच-कहाणी !
वास्तविक स्त्री-जन्म, स्त्री-रुप म्हणजे मूर्तिमंत वात्सल्य, 
स्त्री म्हणजे शालीनता अन् आल्हाददायी-पवित्र मांगल्य
स्त्री म्हणजे परमोच्च कोटीचं मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व
स्त्री म्हणजे भक्कमसं नेतृत्व, स्त्री म्हणजे संस्कारांचं सत्व !
संसार-रथाची दोन्ही चाकं जर का नसतील एक-समान,
तर समतोल पार विस्कटून, परिस्थिती होईल दोलायमान  
बिघडून समाजाचं स्वास्थ्य, बिकट-स्थिती होईल निर्माण !
म्हणून स्त्री-पुरुष दोहोंचं अस्तित्व महत्वपूर्ण, सम-समान !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!