कविता : 🌷" सौख्याची उधळण "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : गुरुवार, १३ जून २०२४
वेळ : रात्री, ८ वाजून २१ मि.
मनास वाटे फार, पक्षी होऊनी पंख पसरवुनी...
गगनी विहरत जावे, अन् घ्यावी निळाई उसनी...
घ्यावा उंच झोका, मनी विचारांचा झुला करुनी
सप्तरंगी इंद्रधनु झळके-नभी रंग-रंग मिसळूनी
मनी उठता तरल-तरंग पिंगा घालती फेरा धरुनी
सुगंध मना प्रसन्न करी वा-यावरती स्वार होऊनी
मन बागडे चौफेर, कोवळे-पिवळे ऊन पांघरूनी
अलगद लोळण घेई मऊ-मखमली-गालिच्यावरी
क्षण-न्-क्षण भाग्याचा, आनंद गगनी मावत नाही
सौख्य उधळे निसर्ग-राणी, घेशी किती दो-करांनी
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply