कविता -🌷 ” सैराट मन “

कविता -🌷 ” सैराट मन ”
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
कधी कधी खट्याळ वारा
हळूच, खोड्या पण काढतो …
ओढणीला हवेत उडत ठेवतो
अन् तिची जणू छेड काढतो …
तर कधी, बरसून रिमझिम सरी
तिला अलगद भिजवून जाई …
ओढणी तिला बिलगुन जाई …
ऊन मग तिच्याशी, लपाछपी खेळणार
तिची ओढणी मग, डोक्यावर शोभणार
मातीच्या सुगंधातही तिचं मन रमणार
बालपणीच्या गमती, आठवत बसणार
त्या कागदी होड्यांमागे धावणं …
लावलेल्या स्पर्धेत, चिंब भिजणं …
मस्त मजेत, वेळेचं भान विसरणं,
लपत-छपतच घरी उशिरा जाणं …
आईच्या पाठीमागे धोशा लावणं
सारं जणू कालच घडलंस वाटणं
कळलच नाही, असं कसं वाढलं वय …
मनाला लागू नाही, काळ-वेळ वा समय !
शरिर त्याच्या, धिम्या गतिने चालणार …
मन सैराट, वार्याच्या गतिने बागडणार …
आठवणींना, कसं बरं बंधनात ठेवणार …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!