कविता -🌷 ” सैराट मन “


कविता -🌷 " सैराट मन "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

कधी कधी खट्याळ वारा
हळूच, खोड्या पण काढतो ...
ओढणीला हवेत उडत ठेवतो
अन् तिची जणू छेड काढतो ...

तर कधी, बरसून रिमझिम सरी
तिला अलगद भिजवून जाई ...
ओढणी तिला बिलगुन जाई ...

ऊन मग तिच्याशी, लपाछपी खेळणार
तिची ओढणी मग, डोक्यावर शोभणार

मातीच्या सुगंधातही तिचं मन रमणार
बालपणीच्या गमती, आठवत बसणार

त्या कागदी होड्यांमागे धावणं ...
लावलेल्या स्पर्धेत, चिंब भिजणं ...
मस्त मजेत, वेळेचं भान विसरणं,
लपत-छपतच घरी उशिरा जाणं ...

आईच्या पाठीमागे धोशा लावणं
सारं जणू कालच घडलंस वाटणं

कळलच नाही, असं कसं वाढलं वय ...
मनाला लागू नाही, काळ-वेळ वा समय !

शरिर त्याच्या, धिम्या गतिने चालणार ...
मन सैराट, वार्याच्या गतिने बागडणार ...
आठवणींना, कसं बरं बंधनात ठेवणार ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!