कविता -🌷 ” सु-संस्कारांचं सिंचन “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – ३० डिसेंबर २०१६
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही- आमच्या शाळेच्या हेड-मास्तरांनी,
विद्यार्थ्याना “प्रोत्साहित” करण्याची, एकमेव अभिनव-शक्कल लढविली
८० टक्के-गुण मिळताच नावाची-पाटी शाळेच्या भिंतीवर कायमस्वरूपी
प्रत्येक इयत्तेतील पहिल्या पाच क्रमांकाची,
त्यामुळे चांगलीच चुरस विद्यार्थ्यात लागलेली
की कोण ही अट पूर्ण करणार सर्वांत आधी …
ही चुरस मात्र फारच निकोप स्वरूपाची होती
“भिंतीवर नाव-लागणे” याचा खरा अर्थ-काय,
हे समजण्याचं वय नसलं तरी ते महत्वाचं आहे,
एवढं बाकी अस्मादिकांना नक्की समजलं होतं,
शिवाय वर्ग-शिक्षकांचंही माझ्यावरंच लक्ष होतं !
त्यांच्या सगळ्या-आशा माझ्यावर होत्या केंद्रित
त्यांची मी “आवडती” असं सगळ्यांना वाटायचं
आईच्या कृपा-आशीर्वादाने-कर्मधर्म-संयोगाने,
त्या वर्षीच्या वार्षिक परीक्षेत, मिळाले ८६ टक्के !
त्यामुळे माझ्या नावाची ठळक लाकडी-पाटी, लिहून-रंगवून खूप उत्साहात तयार केली गेली
उत्साहात मुख्य अतिथींनी भिंतीवर लावली भव्य समारंभ होऊन कौतुकाची भाषणेही झाली
शिक्षक वर्ग-मित्र मैत्रिणींना, प्रचंड आनंद व अभिमान वाटला
थोडी गंमतीची गोष्ट म्हणजे त्यानंतर कित्येक वर्षे कोणालाही,
त्या भिंतीवर एकच नाव, अन्य कोणास स्थान मिळालंच नाही
नंतर ती गोष्ट, साफ विसरले-कॉलेजचे सोनेरी दिवसही संपले
जॉबनंतर बिझनेसमधे रंगले –यथावकाश मग शुभ-लग्न झाले
विशेष अशी घटना म्हणजे, त्यावर्षी शाळा हे मतदान केंद्र होते,
माझे सासर-माहेरचे-नातेवाईक मतदान करण्यास शाळेत गेले
मतदान करुन आल्यावर केवढ्या कोडकौतुकाने नव्या सुनेचं,
शाळेत शिरताच ठळक नाव पाहिल्याचं रसभरीत वर्णन करुन,
आल्या-गेल्या प्रत्येकाला सांगत होते-सुनेच्या हुशारीचं कौतुक !
मनोमन मी आमच्या हेड-मास्तरांना-शिक्षकांना संपूर्ण श्रेय दिलं
नतमस्तक होऊन त्या भन्नाट कल्पनेला कोटी-कोटी प्रणाम
धन्य ते मुख्याध्यापक आणि धन्य-धन्य ते सगळे वर्गशिक्षक
ज्यांनी अविरत परिश्रम करून, सु-संस्कारांचंच केलं सिंचन !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply