कविता – 🌷 ” सुसंस्कारांची शब्दांजली ” तारिख – सोमवार, २४ जून २०१७


कविता – 🌷 ” सुसंस्कारांची शब्दांजली “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले 
तारिख – सोमवार, २४ जून २०१७ 

मातृभाषेचे ते शब्द-वैभव अनुभवुनी,
ऊर अभिमानाने अक्षरशः येतो भरुनी…

मराठी-मनाचा हर्ष सदा दुथडी भरूनी…
अति-आनंदाने जाई पुरताच ओसंडूनी …

परि, 

इंग्रजाळलेल्या पिढीची अशुध्द बोली…
ऐकून नेमकी भाषा कोणती, शंका येई 

माय-मराठीची ती भ्रष्ट-बोली ऐकूनी, 
प्रत्येक काळजाचं होई, “पाणी-पाणी” 

चार-चौघात मातृभाषेची बूज न राखी, 
ही जन-मानसाची व्यथा-बोचरी-दुखरी 

तोडकं-मोडकं इंग्रजी बोलून धन्य होणे…
कुबड्या घेत, काय जीणे ते लाजिर-वाणे

जगभर या लोकांचे, होत्याचे नव्हते होते…
तेंव्हा मात्र त्यांच्या “तोंडचे पाणीच पळते”…!

माय-बोलीचा सन्मान करण्याचे सुसंस्कार…
खात्रीनं बाल-मनांस देतील सुयोग्य आकार !

🌷@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!