कविता – 🌷 ‘ सुसंस्कार ‘

कविता - 🌷 ' सुसंस्कार '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शनिवार, २५ मे २०२४
वेळ -  दुपारी, २ वाजून ५० मि.

बालपणी केलेले सुसंस्कार विसरले जात नाहीत
परिचित-अपरिचित-वडीलधारींना-नमन-होतंच
सहज होतं, तसं न करणं चुकीचंच वाटत राहतं
ऑफिसातल्या-बाबांना-भेटून-बरं-वाटलं-होतं

वडीलधारे म्हणून प्रणाम करताच ते निरोप घेऊन गेले
ते जाता ३-४ मिनिटांत माझ्या अचानक लक्षात आलं
त्यादिवशी लिफ्ट- बंद असल्यामुळे, जिना काळोखात
वयस्कर गृहस्थ पडून अपघात होणं टाळावं म्हणूनच

ऑफिस-बॉयला-टॉर्च-देत,"धावत जा, त्यांना गाठ"
असं सांगून जबरदस्तीनेच त्यास पिटाळून लावलं
पाच-मिनिटात येऊन, म्हणाला,"ते कोठेच नाहीत"
मग त्याला बिल्डींग, पालथीच घालायला सांगितलं

धावपळ पाहून विचारलं हॉलमधील बसलेल्यांनी 
सविस्तर-सांगताच-म्हणाले,"मॅडम हे शक्यच नाही"
कोणी ऑफिसात-आलेलं-वा-गेलेलं पाहिलेलं-नाही"
हे ऐकून चकित-व्हायची-पाळी माझ्यावर आलेली.

🌷@तिलोत्तमा विजय लेले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!