कविता – 🌷  ” सुवर्ण-क्षण  ” 

कविता - 🌷 " सुवर्ण-क्षण "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - गुरुवार, २७ जून २०२४
वेळ - रात्री, ९ वाजून ४६ मि.

ते इवलेसे हात हवेत उंच उभारले
टपो-या डोळ्यांत आर्जव भरलेले

एक क्षणही न दवडता धावत गेले
पटकन् उचलून, सुखाला बिलगले

जगभरातले निर्मम सौख्य तेच होते
मन आनंदाने अक्षरशः नाचू लागले

नगण्य किरकोळ अवास्तव गोष्टींना
महत्व देत का मुकू अमूल्य खजिना ?

मृगजळामागे धावण्याच्या नादातच
घट्ट मुठीतून रेत निसटते, नकळतच

सुखदायक अनुभूतीचे, सुवर्ण-कण
अलगद हवे टिपायला क्षण-न्-क्षण

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🔆🕉️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!