
कविता - 🌷" सुटका "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
कर्म कठीण, मन कळणं
त्याहून कठीण ते जपणं...
क्षणात रागाची लाट उसळे
दुसऱ्याच क्षणी पार वितळे...
दोषांचे खापर हमखास फुटे
तीक्ष्ण बाण, हातातून निसटे...
हे कसं बरं करायचं पूर्ववत ?
सुख भूमीत चाललं झिरपत...
सोन्या-सारखा असूनी जीव
हालत अशी की वाटते कीव...
स्वतःचाच येतो अत्यंत राग
कधी, कसे घालवायचे डाग...
"मी" पणाचा फुकाचा ताठा
"दुर्मती" मधून व्हावी सुटका...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply