कविता :🌷' सुख येईल घरीदारी '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
अपार कौतुकाची आमची गौराईं
आनंदोत्साहास किती उधाण येई
गोळा होती सा-या माहेरवाशिणी
झिम्माफुगड्या खेळू काचा-पाणी
अवघ्या तीन दिवसांची गं पाहुणी
प्रथम दिनी सर्वांनी गायली गाणी
दुसऱ्या दिशी रानोमाळ मस्त फिरे
पुरणपोळीचा नैवेद्य सर्वा तृप्त करे
तिसऱ्या दिवशी उंच झोके ती घेई
भल्या पहाटे नैवेद्य-दहीभात खाई
गोरी गौराई निघाली जाया सासरी
सुंदर तिची पावलं उमटली घरीदारी
अष्टलक्ष्मी नांदो, अशीच असो माया
सर्वां मिळो,तव कृपेची अखंड छाया
सोनियाच्या पाऊली हळूच ती आली
गौराईच्या संगे गं सुख येईल घरीदारी
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply