कविता : 🌷 ‘ सुखाची गुरुकिल्ली ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
दिनांक : गुरूवार २३ जून २०२२
वेळ : ७ वाजून ३० मि.
अवघे जीवन खात्रीनं होईल सरळसूत,
जेंव्हा सदैव पाठीशी, असती अवधूत !
भुकेल्या जीवाच्या मुखी पडतो घास,
श्रमलेल्या जीवाला मिळतो आवास …
खरोखरचं हे नक्की काय आहे गूढ ?
त्यांच्या पाठीशी उभे असती अवधूत !
तहानलेल्या जीवांना मिळते ‘जीवन’…
दीन-दुर्बलांना संकटात मिळे संरक्षण …
दु:खात पिचलेल्या जीवांना दिलासा …
दाट काळोखात त्यांना दिसे कवडसा …
ह्याच्या मागचं नेमकं काय गहन गूढ ?
त्यांच्या पाठीशी, सदैव उभे अवधूत !
आंधळ्या-कष्टी जीवनात भक्कम आधार …
भक्तिमार्गाच्या अवलंबनाने स्वप्ने साकार …
दुष्ट-महापापी जनांना मिळे चांगलाच धडा,
पाप-क्षालनानंतरच होई रिता पापाचा घडा …
असं होण्याचं, नेमकं काय बरं असावं गूढ ?
कारण, त्यांच्या पाठीशी उभे राहती अवधूत !
सन्मार्गावर पाऊल अन् सदा कृतज्ञ असं मन …
श्वासागणिक नाम-जप सदा,”अवधूत चिंतन “
कळत नाही, नेमकं काय आहे अगम्य गूढ ?
भक्तांच्या पाठीशी उभे, रात्रं-दिवस अवधूत !
भक्तिची वा भक्त-जनांची उडवू नये खिल्ली,
भक्तिमार्ग हीच एकमेव, सुखाची गुरुकिल्ली !
भक्तिमार्ग हीच एकमेव, सुखाची गुरुकिल्ली !
🌷@ तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply