कविता – 🌷 ‘ सुखद नाद ‘

कविता - 🌷 ' सुखद नाद '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - ११ फेब्रुवारी २०२४

सुख आणि दुःख तर जीवनात येती-जाती ...
एकमेव साधन असे"नाम"जे जनांस तारी ...

कधी विसरू नये 'नामा'ची अपार महती,
अद्भुत, अद्वितीय अशी त्यात असते शक्ती ...

नामे, सेतू-बांधण्यासाठी शिलाखंड तरंगती ...
रामायणातील ही गोष्ट, आहेच सर्वानुमुखी ...

"अर्ध्या हळकुंडाने पिवळे"नाही होता येत ...
ध्यास असा की दिन-रातीचा नसे भेदाभेद ...

अंत:करणी'प्रणवाचा'मग होई सुखद नाद ...
तोच दाखवीतो सन्मार्ग-मिटवूनी सारेच वाद ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!