कविता -🌷" साळसूद "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
कोणास ठाऊक त्या त्या वेळी,
व्यक्तिला तशीच बुध्दी का होते...
अनावधानाने, भविष्य पालटते...
घटनांची शृंखला घरंगळणारी,
एखाद-दुसर्याच प्रसंगा-वरती...
अशी कशी पूर्ण विसंबून असते...
संपूर्ण घटनाक्रम आता आठवून
उगीचच अपराधी वाटत राहते...
त्यामुळेच मग वर्तमान बिघडते...
प्रत्येक वेळी, प्रत्येक अवस्थेत,
किमान दोन पर्याय असतातच...
त्यावेळी फारसे वेगळे नसतात...
तरीही त्यांचेच अन्तिम परिणाम,
प्रत्यक्षात मात्र विभिन्न असतात...
त्याक्षणी मात्र साळसूद भासतात...
🌷@ तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆
Leave a Reply