कविता – 🌷 ” साधना एक मनस्वी-यज्ञ “

कविता - 🌷 " साधना एक मनस्वी-यज्ञ "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - ११ सप्टेंबर २०१६

तप-साधना एक प्रचंड मनस्वी-यज्ञ ...
ही गोष्ट, एकमते मान्य करती तज्ञ ...

एखाद्या गोष्टीसाठी जी तप-साधना ...
अवघ्या आयुष्यभराचीच आराधना ...

पूर्ण तन-मन-धन अर्पण करू लागे,
तेव्हा कुठे हाताशी थोडं-काही लागे ...

नाम-जप-तपस्या आहे थोडी खडतर ...
कितीही अडथळे आले तरी बेहत्तर ...

सोडता कामा नये या व्रताची कास,
हा एकमेव "बीज-मन्त्र"आहे खास ...

एका रात्रीमध्ये नाही बनले " रोम "...
खचून न जाता ठेवायचा पूर्ण जोम ...

उगीच माजवू नये, अवास्तव स्तोम ...
सततच ध्यास हवा अनुलोम-विलोम ...

संपूर्ण लक्ष्याचा केंद्र हवा एक बिंदू ...
मनात ठेवू नये, किंचितसाहि किंतू ...

नेमकं स्वप्नच जेव्हा मनी ठेवून चिंतू ,
तेव्हाच घडू शकते, एखादी " सिंधू " ...!

🌷@तिलोत्तमा विजय लेले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!