कविता 🌷 ” साद घातली कुणी “

कविता 🌷 " साद घातली कुणी "

कविता 🌷 " साद घातली कुणी "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

चांदण्यांचा मोह अन् चंद्राळली रजनी
आकाशातून गूढ साद, घातली  कुणी...

सारे जग झोपलेले, मन-वेडे-आतुरले
मंद-मंद झुळूक ती जणू थोपटते आहे...

मोह फुलांचा मोह, संपता संपत नाही
निरव शांततेत रात्र अजुनी सरत नाही...

संपूर्ण रात्रही आता, रोखून श्वास आहे
झाली फुले कळ्यांची,गंध सांगत आहे...

चांदण-रात्री प्रीत-सागराला येई भरती,
नभी-मोहक-चंद्र, भन्नाट लाटा उसळती...

भाव-भावनांची नाजुकशी जाळी झाली
सुकल्या नाजूक पिंपळपानी थिजून गेली...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!