कविता – 🌷 ” साखर-पुडा “…
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – शनिवार २१ जानेवारी २०१७
मुलाच्या घरुन होकारार्थी निरोप घेऊन सोमण, रविवारी तिच्या घरी हजर झाले …
त्यांच्या होकारामुळे सोमणांना अतिशय आनंद झाला होता …
“ती” त्यांना वर्तमानात आणंत म्हणाली,”मुलगा पाहण्यातला असला,
तरी ‘होणारा-नवरा’ या दृष्टीनं, आजवर कधी नाही पाहिलं त्याला …”
एकदा त्याला भेटून बोलल्यावरच योग्य निर्णय घेण्यास सोपं जाईल …”
त्यानंतरच मुलाच्या घरातील बाकी सगळ्यांना भेटणं, योग्य होईल …”
दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता तिच्या घरी ते दोघे भेटणार होते …
नेहमीप्रमाणे सकाळी ती उशीराच उठली, आईने “तो येणार” ही आठवण केली…
“नऊ वाजायला १ तासाचा अवधी, फक्त आठच वाजलेत आत्ता” ती म्हणाली …
एवढ्यात दरवाजा वाजला, ती जाऊन बघते तर “तो” चक्क दरवाज्यात हजर …
म्हणाला,”मी, दाखवून घ्यायला आलोय”! त्याच्या “सेन्स ऑफ ह्युमर”वर ती खुश…
ती चकित होऊन,”अजून नऊ नाही झाले” त्यावर म्हणे,”तयार न होता, कशी दिसतेस”
“ते समजावं म्हणून एक तास आधी आलो, नाहीतरी तयार व्हायला एक तास लागणार”
या त्याच्या बोलण्यावर तिची कळी खुलली होती अन् ती दिलखुलासपणे हसली होती …
दोघांना मोकळेपणानं बोलता यावं म्हणून, तिची आई कामाचं निमित्त करुन गेली आत …
त्याचा स्वभाव मोकळा-ढाकळा वाटला, खोटेपणाचा अभाव आणि सरळ मनाचा वाटला
सर्वप्रथम,”तुझा उद्योग वाढविण्यासाठी, माझ्याकडे नसले तरी माझ्या वडीलांकडे पैसे आहेत “
त्यावर “तशी पैशाची लगेच गरज पडणार नाही” हे तिनं स्पष्ट केलं, मग तो विषय तिथेच संपला…
त्यानंतर तो तिच्या ऑफिसवर तिला भेटला, टी-सेंटरला भेटला, खूप छान गप्पा जमल्या होत्या …
” फाइन् डायनिंग “ला ते गेले …समुद्रावर रेतीत मस्त फिरले-तिला चिंता त्यांची जोडी कशी दिसेल …
त्याचं शरीर कमावलेलं पीळदार पण ब्रूस-ली सारखं स्लिम-“लीन”
तो अँथलेटिक, स्पोर्टसपर्सन, फास्ट स्वीमर, एक्सपर्ट-लॉन-टेनिस-प्लेअर …
मातृ-मंदिरला ती भरत-नाट्यम् करायची, तेव्हाच तो खेळायला यायचा लॉन-टेनिस …
दोन्ही हातानी खेळू शकायचा, पण जन्मतः-डावरा असल्यानं, डाव्या हाताने सहजपणे हरवायचा …
उच्च-शिक्षित, वाचनाचा अतिशय नाद, खाताना-झोपताना-प्रवासात सतत वाचन करायचा …
“बिझनेस, तू सपोर्ट केलास तर नक्की करीन” असं म्हणून त्याने तिचं मनच जिंकलं …
त्याच्या घरची सगळीच मंडळी जेव्हा तिची पसंती त्यांना कळली,
अत्यंत खुश झाली होती-कारण त्याला कोणीतीही मुलगी, यापूर्वी पसंतच पडली नव्हती …
कदाचित त्यामुळेही असेल, दोन्ही घरांतून वडील-मंडळींना घाईच झाली होती लग्नाची …
पंधरा ऑगस्टला साखर-पुडा झाला, समारंभ अगदी दोन्ही घरापुरता होता,
देणं-घेणं मानपान,अगदी नावा-पुरतं-अंगठी,घालताना तो हसत-हसत म्हणाला,
पंधरा ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला होता …
“या दिवशी, आम्ही मात्र घालवली आहे स्वतंत्रता” …
“अखेर मिळवला आहे तिचा हात, हातात माझ्या “…
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅
Leave a Reply