कविता -🌷 " साक्षी-भाव "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
काही वेळा अगदी उफराटंच घडत जातं...
प्रयत्न करुनही, फासे उलटे-ते-उलटेच...
जीव ओतूनही यश हुलकावणी देत जातं...
हातोहात गडप होऊन चक्क हताश करतं
अशा वेळी काय करावं, ते-समजत-नाही
पण हातावर-हात ठेवून, बसवतही-नाही...
काय बरोबर अन् काय चूक याच द्वंद्वात...
विचारांचे काहूर उठते जणू तो झंझावात
लाटा जशा एका-मागोमाग, आदळतात...
मन-बुध्दी नेटाने उपाय शोधतच राहतात
अळवावरच्या थेंबा-समान अलिप्त राहून
प्रत्येक गोष्टीस आजमावावे निर्लेप होऊन
मनात साक्षी-भाव-ठेवून तटस्थपणे-पाहता
वेगवेगळे-मार्ग-दिसतील, प्रश्नामध्ये-न-गुंतता
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply