
कविता 🌷 " सांजवेळ झाली "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
सांजवेळ झाली अन् वेडे मन मोरपंखी झाले
मनाच्या पाना-पानातून कोण करतो हे इशारे...
रंध्रांतूनी फुला-फुलांच्या हळूच गंधाळले वारे
नभामध्ये ढगाआडून, लुकलुक करणारे तारे...
सांजवेळ झाली अन् पक्षांचे थवे परतू लागले
चोच-उघडी-घरट्यात-भूकेजली बिचारी पिल्ले ...
सांजवेळ झाली अन् गायींचे घुंगरूं निनादले
पाडसांच्या कळपातून इवलेसे वासरू हंबरले...
सांजवेळ झाली अन् कळ्यांनाही बहर आला
सृष्टीमध्ये सृजनाच्या आनंदास पारावार नुरला...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply