कविता - 🌷 " सहजच उचलू मेरु-पर्वतही " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
नरक-चतुर्दशीला, खूप नावांनी ओळखतात रूप-चतुर्दशी-काली-चौदस असंही म्हणतात विविध नावांनी आनंदोत्सव साजरा करतात दरवर्षी शोषणकर्त्या-दुष्टालाच जणू मारतात...
कृष्ण-सत्यभामानी मध्यरात्री याच तिथीला, क्रूर -दुराचारी अशा नरकासुराचा वध केला... मुक्त केलं, छळवणूकीने ग्रासलेल्या प्रजेला... सूर्योदय-होण्याच्या आधीच क्रूरात्मा-वधला...
भुदेवीच्या रूपे सत्यभामा कृष्णास साथीला अशारितीने शूरवीर-द्वयीने मारून राक्षसाला, बंदिवासातील सोळा सहस्र बंदिवान-अबला बंदिगृहातून-घोर अत्याचारांतून, मुक्त केल्या
श्रीकृष्णानेच, दुराचाराला संपूर्ण विराम दिला... ब्रह्म-मुहूर्ती सचैल-स्नानाने तो शुचिर्भूत झाला... तिन्ही लोकी सर्वांनी आनंदाचा जल्लोष केला... हा दिवस-"छोटी-दिवाळी"म्हणून साजरा केला...
असुर-वध-स्मृती म्हणून अभ्यंग-स्नानाची प्रथा... सचैल स्नान, धूत-वा कोरी-वस्त्रं, फराळ-नाश्ता... अशी सुरु झाली,उत्सव साजरा करण्याची प्रथा... आजतागायत जन-मानसात रुजली आहे कथा...
समाजातील छुप्या, अत्याचारी-दैत्यांना शोधून... आजही गरज आहे, श्रीकृष्ण-सत्यभामा बनून... अत्यंत-जरुरीचं-आहे छुप्या-नरकासुरांस-मारणं... आवश्यक आहे, त्यांचा समूळच निप्पात करणं...
नरकासुर जसे बाह्य-जगातले, तसेच मनातलेही.. त्या सर्वांना हुडकून काढून नष्ट करणं, जमेलही... कारण"प्रयत्ने वाळूचे कण रगडीता गळे तेलही" जर मनावर घेऊ तर सहजच उचलू मेरु-पर्वतही...
Leave a Reply