कविता : 🌷” सर्वपित्री अमावस्या “

कविता : 🌷“ सर्वपित्री अमावस्या “
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

ॐ पितृ गणाय विद्महे जगतधारिणे धीमहि तन्नो पित्रो प्रचोदयात्।।
ॐ कुलदेवतायै नम: ।। ॐ पितृ देवतायै नम: ।।

पितृ अमावस्या, महालय अमावस्या आणि पितृ मोक्ष अमावस्या
या व अशा अनेक नावांनी ओळखली जाते, सर्वपित्री अमावस्या

पितरांना तर्पण करण्याचा-श्राद्ध पक्ष-पितृ पक्षाचा अंतिम दिवस
पूर्ण पंधरवड्यात केलेल्या प्रार्थनेची सांगतां करण्याचा, हा दिवस

आपल्या पूर्वजांचे पुण्यस्मरण करुन ऋण फेडण्याची नामी-संधी
तेलाचा दिवा, पितृ-सूक्ताचे मंत्र पठण, विधी-पूर्वक संध्याकाळी

पितृ प्रार्थना केल्याने, अन्य सर्व बाधा दूर होऊन पितृदोष-निवारण
आजी-माजी-आगामी सर्व पिढ्यांना लाभते, पितरांचे शुभाशिर्वचन

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!