कविता - 🌷 " सरडे सर "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शनिवार, ८ एप्रिल २०१७
यंदाचं तिचं सातवीचं, स्कॉलर-शिपचं वर्ष
स्कॉलरशिप मिळवणे म्हणजे मोठा संघर्ष
शाळेचे प्रत्येकच शिक्षक आपापल्या-परिने,
अगदि समरसून, जीव ओतूनच शिकवायचे
प्रशिक्षण संपून उजाडला तो परीक्षेचा दिवस
भल्या पहाटे जमलो तर खूपच मोठा पाऊस
सरडे सर ब-याच पिशव्या घेऊन आले होते
कालपासून, सामानाची खरेदीच करत होते
परीक्षार्थींना प्रत्येकी दोन पेन्स शाई भरून,
पेन्सिल्स-कंपास-पाणी, थर्मास दूध भरून
त्यांच्या थैलीत, सारं ब्रह्मांडच जणू भरलेलं
ऐनवेळी कसलीही,गैरसोय न व्हावी म्हणून
शेवटी सरांची-विद्यार्थ्यांची वरात एकदाची,
चालत गोरेगाव स्टेशनवर येऊन पोहोचली
आम्हास बाकड्यांवर बसवून, सरडे सरांनी
सगळ्यांची, रेल्वेची रिटर्न-तिकीटं काढली
परीक्षेचा हाँल गाठेपर्यंत सर एकेक जिन्नस,
लिमलेटच्या गोळ्यांपासून क्रमाने देत होते
परीक्षा आटोपल्यावर ऊसाचा थंडगार रस
शुध्द तुपाचा शिरा-वडे-डोसा, होती चंगळ
विद्यार्थी, आपसात बोलण्यातच गर्क होते
सरडे सर मात्र, तृप्त-नजरेने हे पहात होते
ते शिक्षक असूनही, आमच्या स्मृती मध्ये
विद्यार्थ्यांचे प्रेमळ पालकच अधिक वाटले
🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🌅
Leave a Reply