आजच्या शुभ दिवसाचं आहे अनन्यसाधारण असंच महत्त्व वैशाख मास शुद्ध तृतीया, तिथी आहे "अक्षय-आणि-अनंत " अर्थात् कधीही नाश न पावणारी अशी संपदा म्हणून अक्षय, या शुभ दिनी त्रेतायुग-प्रारंभ झाला होता, हाच खरा आशय
जेव्हा सज्जनांचा छळ-अन्यायादी करुन दुष्ट अधर्मी माजतात, भगवत् गीतेतील श्लोकानुसार ईश्वर अवतार घेऊन प्रकटतात धर्म:पतन थांबवून सुजनांची रक्षा करण्या, श्रीविष्णु प्रकटतात युगे-युगे जन्म घेऊन दुष्ट-दानव-दैत्यांचा समूळ विनाश करतात
ईश्वर जसे अवतार घेतात, कलियुगात राक्षस रुपं धारण करतात लाच-लुचपत-अन्याय-शोषण-दारु-अफू-व्यसनादी रुपांनी येतात अधम वृत्तींचा समूळ नि:प्पात करुन, शांति प्रस्थापित करण्यास, सुधर्म पुन:स्थापित करण्यास भूवरी पुनःपुन्हा भगवंत अवतरतात
Leave a Reply