कविता : 🌷" सबला "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
खूप वर्षांपूर्वी जुने कपडे देऊन नवी-कोरी भांडी मिळत असत
हा व्यवसाय करणार्यांना बोहारी-किंवा-बोहारीण-म्हणत-असत
आमच्या भागात नेहमीच येणारी बोहारीण, बंजारा जमातीची
ती उंच-नाकी-डोळी-नीटस-हसतमुख, बडबडी, मीना नावाची
"घे भांडीssय" ही तिची आवई पण तिच्यासारखी, खास होती
सांगितलेले-डबे-फ्राय-पॅन-तांब्याचं-पिंप आदी घेऊन ती यायची
तिला बोलावलं की हमखास एका-तासाची तरी बेगमी ठरलेली
गप्पा मारता-मारता तिला हवे ते कपडे, मला द्यायला लावायची
कौतुक वाटे, माथी भांड्यांचा-भार-गाठोडे-घेऊन तोल-सांभाळणं,
मैलोन्मैल चालून, हूज्जत घालून व्यवहार करुन, घरही चालवणं
एवढं सारं करुन, घरी जाऊन मुला-बाळांच्या मुखी-घास-घालणं,
एक-दोन दिवस नाही तर उभं-आयुष्य अशा रितीने हसत-जगणं
नुसत्या कल्पनेनं माझ्या सर्वांगावर सरसरून काटा उभा राहिला
ते प्रत्यक्ष तसं हसत-खेळत जगणा-या मीनाचा अभिमान वाटला
जणू शूर राणी लक्ष्मीबाईंं-सम जीवन-रणांगणी, ती धैर्याने लढतेय्
स्त्रिया अबला-नसून, दुर्गा-काली-सम सबला आहेत, सिद्ध होतेय्
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply