कविता : 🌷” सबला “

कविता : 🌷" सबला "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : गुरुवार, १७ जुलै २०२४

खूप वर्षांपूर्वी जुने कपडे देऊन नवी-कोरी भांडी मिळत असत
हा व्यवसाय करणाऱ्यांस बोहारी किंवा बोहारीण म्हणत असत

आमच्या भागात नेहमीच येणारी बोहारीण, बंजारा जमातीची
ती उंच-नाकी-डोळी-नीटस-हसतमुख, बडबडी, मीना नावाची

"घे भांडीssय" ही तिची आवई पण तिच्यासारखी खास होती
सांगितलेले डबे, फ्राय पॅन, तांब्याचं पिंप आदी घेऊन यायची

तिला बोलावलं की हमखास एक तासाची तरी बेगमी ठरलेली
गप्पा मारत-मारत तिला हवे ते कपडे, मला द्यायला लावायची

कौतुक वाटे माथी भांड्यांचा भार-गाठोडे घेऊन तोल सांभाळणं
मैलोन्मैल चालून, हूज्जत घालून व्यवहार करुन, घरही चालवणं

एवढं सारं करुन, घरी जाऊन मुला-बाळांच्या मुखी घास घालणं
एक-दोन दिवस नाही तर उभं आयुष्य अशा रितीने हसत जगणं

नुसत्या कल्पनेनं माझ्या सर्वांगावर सरसरून काटा उभा राहिला
ते प्रत्यक्ष तसं हसत-खेळत जगणा-या मीनाचा अभिमान वाटला

जणू शूर राणी लक्ष्मीबाईंसम जीवनाच्या-रणांगणी धैर्याने लढते
स्त्री अबला-नारी नसून दुर्गा-काली-सम सबला आहे, सिद्ध होते

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!