कविता - 🌷 ' सत्व परिक्षा '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - मंगळवार, १४ मे २०२४
वेळ - दुपारी, १ वाजून १३ मि.
त्या मुलांमधील निरागस-कोवळी बालमनं,
पार खच्ची होऊन जाती, विपरीत स्थितीनं
मग ती बिचारी मुलं आहे त्या परिस्थितीत
मन रमवतात, खेळतात बाहेरच रस्त्यांवर
बागडतात गल्ली-बोळात, झाडा-झुडपात
स्टेशनांवर, जुन्या पाण्याच्या पाईप्समध्ये,
नदीनाले, चिखलात, कचर्याच्या पेटीमध्ये
चिंध्याच बांधून फुटबॉल करून, खेळतात
चुकुनही कपडे धुण्याचा धोकाही मिळाला,
तर मग त्याचाच वापर होतो, बॅट सारखा
मग मस्त खेळच रंगतो, गल्लीत क्रिकेटचा
मिळेल ते, पडेल ते काम करतच रहातात
राब राब राबतात, चार पैसेही कमावतात
जमेल तसे जमेल तितके, शिक्षणही घेतात
घरच्या आमदनीत जमेल तशी भर घालती
विधाताही किती प्रकारच्या करतो करामती
घेत असतो, सत्व परिक्षा लहानशा जीवांची
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply