कविता : 🌷 ‘ संस्कृतीचा आवाका ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : शनिवार, ३ जून २०२३
वेळ : संध्याकाळी, ७ वाजून ६ मि.
“वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे” इति संत तुकाराम
“पक्षीही सुस्वरे आळविती”अभंगात म्हणती महाराज
वड-पूजनाच्या माध्यमातून आजही स्त्रिया ते पाळतात
निसर्गाच्या सान्निध्यात राहून सर्व नातीही दृढ करतात !
अर्वाचीन हिंदू संस्कृती फार दूरोगामी विचार करणारी
सृष्टी-निर्मितीपासून आजवरच्या मानवी वाटचालीची,
साक्षीदार ती, अथपासून इति-पर्यंतची एकमेव साथी
जसा महाभारतातील, अर्जुन-सखा-श्रीकृष्ण-सारथी !
स्त्री हाच कौटुंबिक मूल्य-मापनाचा खरा आधारस्तंभ !
सृष्टीचा समतोल, स्त्रियांच्याच माध्यमातून होतो प्रारंभ
पृथ्वी-जल-अग्नि-वायु-आकाश, पंच-महाभूती सेतुबंध
मानवी-शरीर व पंच-ज्ञानेंद्रियांशी निगडित घनिष्ठ संबंध !
वट-पौर्णिमेच्या निमित्ताने अर्धांगिनी करती आराधना,
पतिच्या दीर्घ-आयु-आरोग्यासाठी व्रत-वैकल्य-साधना
उपवासाच्या माध्यमातून प्रकृती-स्वास्थ्याची जोपासना
नव-वस्त्र-अलंकारांनी नटून, सखी-शेजारणींसह अर्चना !
एका दगडात नव्हे-एका दिवसात किती मोठा आवाका
निसर्ग-प्रेम, पति-प्रेमादर, सख्यांबरोबर हास्य-धमाका !
उपवासामुळे सात्विक विचार-आहार आरोग्याची निगा
पिढ्या-न-पिढ्या व्रतस्थ-तटस्थ वट-वृक्ष भक्कम उभा !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
“
Leave a Reply