कविता 🌷 ” संवेदनशील-मन “

तारिख – रविवार, १६ एप्रिल २०१७
कवितेचं नाव-🌷” संवेदनशील-मन “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले 

गौतमच्या बोलण्यातच एक मातीचा,
वाईच्या भाषेचा सुगंधीत हेल यायचा,  
त्याचाही त्याला अभिमानच वाटायचा …
इतरांचं चिडवणं तो काणाडोळा करायचा 
कशाचा त्याला न्यूनगंड, नाही येऊ द्यायचा 
मात्र त्याची ” हिंदी ” ऐकूनही हसू आवरणं,
म्हणजे सर्वांना व्हायचं अत्यंत कर्म कठीण …

ती त्याला बजावायची नुसतं “है” लावलं की,
भाषा बदलत नाही, लक्ष देऊन शिकून घे की …
मग त्याचं, खजिल होऊन,” मॅडम सॉरी सॉरी “
हे ऐकून तिला हसावं की रडावं कळायचं नाही …

“अजून सराव झालेला न्हाई, वाईच थांबा, मंग फाड-फाड
हिंदीच न्हाई तर इंग्रजीत सुध्दा बगा, बोलतो की न्हाई “…

हे इतक्या मनापासून निष्पापपणे म्हणायचा,
की हसून-हसूनच पोटात लागायचं, दुखायला 
त्याला शेवट पर्यंत कारणच नाही, समजायचं
अचानक असं काय झालं, सगळेजण हसण्याचं 

रविवार सोडला तर दररोज, ती अजंठाच्यां घरी
सकाळी नाश्ता उरकून-सासरचा मेनू ठरवायची,
स्वैपाक्याला सामान देऊन मग,आँफिस गाठायची

ह्यामुळेच अजंठाच्यां घरी, झाडू-पोतं व्हायचं नाही
ते करणार्या नोकर-माणसांची वेळ जमायची नाही …
रविवारी,बरीच वर्दळ,ये-जा असायची तिच्या घरी
त्यामुळे बर्याच वेळा तिची फारच पंचाईत व्हायची

एकदा गौतमच्या ते लक्षात आलं …परस्पर दर रविवारी,आळीपाळीनं,
चौघा डेलिव्हरी-बाँईजनी, गुपचुप ठरवून तिला केलं, आश्चर्य-चकित !

पहिल्याच रविवारी, सकाळी नऊ वाजता,
बेल वाजता, तिच्या हातात कचर्याचा डब्बा 
दरवाजा उघडते तर, गौतम दत्त म्हणून उभा !
“अरे आज रविवारी तू इथे कसा काय बाबा?”

 ” लाजून म्हणाला, काई न्हाई, मनात आलं,
 म्हणून भेटाया आलो, म्हंजी आत येऊ काय”?
 “तुम्ही रागावणार नसाल तर सांगतो म्या आज,
  येताना केळी चांगली दिसली, घेऊन आलोय”…
 “ठीक आहे, पण जाताना पैसे घेऊन जायचेत”
 
 तिने त्याचं पाहुण्या-प्रमाणे चहा- नाश्ता देऊन,
 आगत-स्वागत झाल्यावर,त्यानं हाती,झाडू घेऊन,
 एकन्एक कोना-कोपरा, स्वच्छ-साफसूफ करुन,
 मग पोता करून, पंखे, ट्यूब-लाईट्स, झुंबरं अन्
 अगदि खुर्च्या-टेबल्स, सोफे सगळंच लखलखित !
 
जेवणाच्या वेळी तिनं त्याचंही पान वाढल्यावर,
“म्या डबा घिऊन आलो तो दुपारच्यान् खाईन,
आत्ता म्या जेवनार हाय”ऐकून तिला बरं वाटलं …

संध्याकाळी, त्याला “आता तरी घरी जा रे बाबा,
थोडा आराम कर ” म्हणून सांगावं तेव्हा तिला,
“आज आमची ड्युटी लागली, रविवारी फुडल्या,
मोहनचा, मग गजाचा, नंतर नंबर फुलवाल्याचा”

“म्याच सगळ्यांचा नंबर लावलाय, रविवारी, ही” जोड-गोळी “कराया “
जोड-गोळी हा त्याचा “कोडवर्ड ” होता, झाडू-पोता या घरच्या कामाचा 

तिला मनापासून त्याचं खरंच कौतुक वाटलं …
न बोलता, न सांगता, इतकी संवेदनशीलता 
ऐन विशीतच विचारांची एव्हढी परिपक्वता …
असं मन म्हणजे, दिव्य-देवत्वाचा-साक्षात्कार …
यानंतर घडलेल्या घडा-मोडी ,पाहूया पुढच्या विशेष भागान्ती 
🌷@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🌅🕉🌷🙏




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!