कविता – 🌷 ‘ संधिकाल ‘

कविता - 🌷 ' संधिकाल '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शुक्रवार, १९ एप्रिल २०२४
वेळ - रात्री, १० वाजून ३५ मि.

दररोज सूर्य उगवताना अन् मावळतानाही
मनावर संमोहित स्थितीत तो करी जादूही

तो देखावा कोरला जातो-कायमचा मनावर
एक सम्राट मावळणार-सिंहासन सोडणार,

नभ-सिंहासनी, चंद्र-देव विराजमान होणार 
साथीला चांदण्यांचा ताफा ते घेऊनी येणार

मावळणारा सम्राट राज्याची, सूत्रे सोपवून
राज्य उगवत्या-सोमदेवाच्या-हवाली करुन

राजसपणे आदित्य-देव रंग उधळत जाती
आनंदित निशाही येते, रजनी-नाथा संगती

मावळतीच्या-लाल-सोनेरी-रंगाचं मायाजाल
हाच अपूर्व अद्भुत सोहळा म्हणजे संधिकाल

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!