कविता - 🌷 " संदेहाचा विलय "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शनिवार, २० एप्रिल २०२४
वेळ - रात्री ८ वाजून ५९ मि.
खरं तर आपण आहोत
अत्यंत गर्भ-श्रीमंत...
आपल्या अंतःकरणात
सदैव अखंड वाहणारा
आनंदाचा आहे झरा...
मुक्त हस्ते उधळूया...
हा आनन्दाचा ठेवा...
नाहीतर ही सुवर्ण-संधी
हातची निसटून जाईल...
भक्तिभावानं चिंब भिजलेला...
हा अपूर्व प्रेम-संदेश
संपूर्ण विश्वभरात
मग गुंजत राहील...
बंधू-भावाचे सेतू बांधून
मना-मनांच्या खाई मधील
अमर्याद अन्तर
नक्कीच मिटवंता येईल...
वितळूनी पापांच्या राशी,
लख्ख प्रकाशाची
पुनः येईल प्रचिती...
नामाचा गजर सतत
मनान्तरी गर्जत राहील...
अन् त्याचा गुंजारव
नेहमीच निनादत राहील...
नामाचा टाहो फोडून,
अंतस्थ संदेहाचा
सम्पूर्ण विलय होईल...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply