कविता - 🌷 ' शैक्षणिक-सुवर्ण-काळ '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - रविवार, १४ एप्रिल २०२४
वेळ - दुपारी, १ वाजून २२ मि.
त्याकाळी स्कॉलर-शिपचा दबदबाच होता
परीक्षा देण्यासाठी केंद्र असायचे दादरला
त्यामुळे आम्हा-परिक्षार्थींचा फायदा झाला
उपहारगृहात मस्तपैकी, ताव मारता आला
आग्रह करुन आम्हालाच खाऊ घालण्यात,
सरांनी, विशेष असं काही खाल्लंही नव्हतं
आम्ही मात्र स्वतःच्याच मस्तीत होतो व्यस्त
खूप नंतर आम्हां सर्वांना सत्य समजलं होतं
इच्छा होती पण शाळेचे तुटपुंजे होते उत्पन्न
त्यामुळे आमचा एकूण एक सगळाच खर्च,
सरांनी स्वतः पगारातून स्वेच्छेने केला होता
शाळेने जुजबीच रक्कम दिली होती त्यांना
मोजके रेल्वे-रिटर्न-तिकीटांचे पैसे दिले होते
तरीही सरडे सरांनी आमचे सर्व लाड पुरवले
आजची परिस्थिति नेमकी याच्या उलट आहे
पदरमोड करणं, तर फार दूरवरची गोष्ट आहे
आज मात्र पालक-विद्यार्थी यांची अगतिकता
शिक्षण-क्षेत्राबद्दल मनात अध्यारूत-पवित्रता
एकूणच शैक्षणिक-क्षेत्रातील व्यावसायिकता
शिक्षणाशी निगडितही-ढासळणारी नितीमत्ता
आजची शिक्षण-क्षेत्राची ही परिस्थिति पाहता
वाटतं खात्रीने तो शैक्षणिक सुवर्ण-काळ होता
🌷@तिलोत्तमा विजय लेले
Leave a Reply