कविता - 🌷 " शून्य "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
एखादं प्रचंड भलं-मोठ्ठं असं शून्य,
आकार द्यावा तेवढं व तसंच बनतं...
बहुधा आयुष्याचं, तेच होतं असावं...
जसा आकार द्यावा तसं बनत जातं...
जेवढी म्हणून स्वप्नं पाहिली ती पण,
सारी साकारत गेली कळत-नकळत...
म्हणून वहावत गेलं असावं वेडं-मन...
कदाचित हेच ते तरुणपणाचं वेडेपण...
म्हणतात जसं पेरावं तसंच ते उगवतं...
मग जन्मापासून प्रेमाचं-मायेचं सिंचन,
कसं वाया जाऊच शकतं असं एकदम ?
योग्य-वेळी पहाटे-पहाटे अंत होईल तम...
मुलांनी घोड-चुका केल्या, लाख-लाख...
मोठ्या मनाने पोटात घेतात, माय-बाप...
काणाडोळा करून पूर्ण दुर्लक्ष करतात...
पोटच्या-गोळ्याला पुरतं, माफ करतात...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆
Leave a Reply