कविता – 🌷 ‘ शिकवण ‘

कविता - 🌷 ' शिकवण '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - ६ जून २०१७

चार दिवसांची जोडून सुट्टी मिळाली
सहजच गंमत म्हणून भटकंती ठरली

सगळेजण पोहोचलो महाबळेश्वरला
छान वाटत होतं थंड हवेंत फिरायला

भटकताना अचानक गाराच पडल्या
बघता-बघता दाही-दिशा गर्द झाल्या

सर्व परिसर धुक्याने, काबीजच केला
द-या-डोंगर-रस्ताही दिसेनासा झाला

त्या-धुक्याने, एक धडाच शिकवलाय
हे असंच कधीही, कुठेही होऊ शकतं

जीवनाचा रस्ता अंधूक-धूसर असेल,
त्यामुळे पुढचं काहीही दिसत नसेल,

तर दूर-वरचं पाहण्याचा प्रयत्न करणं,
हे व्यर्थ वाटणं-निराशाजनक मन होणं

साहजिकच असताना, जर खंबीरपणे
परिस्थितीला सामोरे जाऊन शांतपणे

धीरानं, एक-एक छोटी पावले टाकून,
जर पाहीलं, तर सहजच लक्षात येईल ...

जीवनात, नागमोडी-क्लिष्ट वळणांवर
रस्ता आपोआप, सुस्पष्टच होत जाईल

सरळ-सोट सोपीशी पाऊल-वाट दिसेल,
जीवन-यात्रा सुखद-आनंदी होऊ शकेल !!

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!