कविता - 🌷 " शब्दातीत नातं " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
वर्षातून भाऊबीजेचा-हा-दिवस, येतो एकदाच... भावा-बहिणींच्या स्मृतीत, असे तो कायमचाच... भाऊ-बहिण यांच्या नात्यातल्या दृढ विश्वासात, निर्मितो विशेष-बंध-नाजुक-बालपणा-इतकाच...
लहानपणी त्याच्यातला गर्भितार्थ, नाही कळत... वय ते इतकं निरागस, सगळं डोक्यावरुन जातं... खेळण्या-बागडण्या-पलीकडे काही नाही सुचत, गॊड-धोड खायचं व नवीन कपड्यांत मिरवायचं ...
अनार-बिनार-सारखे"बाळबोध"फटाके फोडायचे, मोठया फटाक्यांना भिऊन खूप लांबवर पळायचे, ओवाळून झाले, सर्व मोठ्यांना नमस्कार करायचे बस्सं एवढं झालं की लगेचच खेळायला पळायचे ...
मोठी झाल्यावर सूक्ष्मपणे सणवार-सर्व-रीतीभाती, समजून त्यांचं महत्त्व लक्षात येत गेलं, काही-अंशी... त्याकाळी-माझ्या-मैत्रिणींना-माझा,फारच वाटे हेवा ... कारण भाऊ-बीजेसाठी-माझे, सख्खेच-भाऊ-सहा ...
मी पण भाव खाऊन सांगायची वर्णन, खूप रंगवून ... सर्वच मामला गमतीचा, हसूच येतं सगळं आठवून... दिवाळीच्या सुट्टीत नवनवीन कपडे विकत घ्यायचे... प्रत्येक दिवशी दिवाळीच्या, नटून-थटून मिरवायचे...
न जाणो, किती जन्मांचं पुण्य फळाला आलं म्हणून... सहा भावांची छोटी बहीण हे सद्भाग्य लाभलं म्हणून ... आई-वडिलांइतकंच, भावंडांचं प्रेमही मिळालं म्हणून... अशक्य परतफेड-करणं त्या-विधात्याचे-लक्ष-लक्ष-ऋण...
Leave a Reply