कविता : 🌷 ‘ शब्दांजली ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : ७ फेब्रुवारी २०२३
वेळ : ८ वाजून २० मि.
श्रुतीन्-श्रुती का बरं आज रुसली ?
साक्षात् सरस्वती कुठं असेल लपली ?
सर्व रसिक मंडळीं झाली रडवेली …
गान-कोकीळा हे जग सोडून गेली !
अवघं विश्वच जणू काही पोरकं झालंय्
सुरांविना शब्दही फिके, एकाकी झालेत !
सुरात्मा गेला आता उरली फक्त पोकळी,
हिंदवी गान-कोकीळा हे जग सोडून गेली
घरादाराचा भार, ‘गात-गात’ पेलणारी
साधं-सरळ-हसरं व्यक्तीमत्व असलेली
असामान्य कर्तृत्वाने दीपवून टाकणारी
लाडकी कोकीळ-कंठी अंतर्धान पावली !
सुरेल आवाजाने काळीज छेदणारी
संपूर्ण जगाची, ‘लता-दीदी’ असलेली,
देवादिकांना रिझविण्या सम्राज्ञी गेली,
आपली गान-कोकीळा अजरामर झाली !
आपली गान-कोकीळा अजरामर झाली !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply