कविता - 🌷 " विश्व-निर्माती “ कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च। दधाना हस्तपद्माभ्यां कूष्मांडा शुभदास्तु मे ।।
दुर्गा-देवी जेव्हा संपूर्णतः झाली तेजांकीत, तिच्या सुहास्य-वदने, विश्व झाले निर्मित ! त्याआधी पूर्ण-जग बुडलेलं, घोर अंधारात म्हणून ’विश्वनिर्माती-आदिशक्ति’ म्हणतात
आठ करांमुळे कूष्मांडा देवी "अष्टभुजा " अत्यंत उष्म-सूर्य-लोकी, निवास देवीचा सगळ्या ग्रहांना हेवा वाटे तिच्या तेजाचा होई मान-सन्मान, दिव्य-स्वरूप-मातेचा
देवीची सुवर्ण-कांती तेजाने झळाळणारी सु-हास्यातून बिजली-समान तळपणारी देवीची आभा, सूर्यासम प्रकाश फेकणारी स्वत:, अंडाकृती-ब्रह्मांड निर्माण करणारी
जर भक्तिपूर्ण-भावनेसह तिची पूजा केली लाभेल प्रकृती-स्वास्थ्य-आयु-नाम-किर्ती शक्तिचा-ज्ञानाचा-उगम, अज्ञानाची क्षिति म्हणूनही-योगी "कूष्मांडा-स्वरूपा" पूजती
देवीच्या कृपेमुळे मनामधील मळभ नष्ट होते प्रकाशमान-अंतर्मनी-निराशा पार जळून जाते सूक्ष्म-ब्रह्मान्डात अंतर-बाह्य समतोल आणते माणसाला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सोडविते ...
Leave a Reply