कविता - 🌷 " विमानातील कविता "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
सकाळी भल्या पहाटेच उठून, वेळेत सर्व प्रातर्विधी आटोपणं,
झटपट तयार होऊन निघणं म्हणजे, तारेवरची कसरत करणं
पण आनंद-यात्रींना यामध्येही येते प्रचंड आनंद-दायी अनुभूति
अनंत-आनंद-लहरी-उठती अन् अंगांगातून-नकळत-सळसळती
उद्या जाण्याच्या विचारांनी, कालपासूनच झोप पार उडवलेली
पण प्रत्यक्षात ती वेळ येता मात्र नुस्ती प्रचंड तारांबळ ठरलेली
इतकं सगळं होऊनही, अगदि यथासांग-यथोचितच सारं काही
सहज हलके तरलसे भाव-तरंग उठती, अचानक या भवसागरी
काळ्या-पांढ-या-सोनेरी ढगांशी सूर्यकिरणांचा लपंडाव तो गोड
विमानातील खिडकीमधून, एकूण नभीचा नजाराच नजर-फोड
जेंव्हा कधी हा शोध लागतो, अनावर होई मन:शांतीचा गहिवर
भ्रमर-मनं हळूच जाऊनी बसे, थेट बाहेरील पिंजलेल्या ढगांवर
प्रत्येक क्षण दुसर्याहून पार निराळा ...
प्रत्येक क्षणी, गूढ आनंदाचा लळा ...
मिटताच आप-पर-भाव तो, सगळा ...
सतत चालतो परमानंदाचा सोहळा ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆
Leave a Reply