कविता - 🌷 ' विधिलिखित '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - रविवार, २८ एप्रिल २०२४
वेळ - रात्री, ११ वाजून ३७ मि.
गुरु द्रोणाचार्यांनी नकार दिल्याने
केवढं मोठं धाडस करुन कर्णाने
मिळविले, शिष्यत्व परशुरामांचे...
अत्यंत चिकाटीने-उपजत गुणांनी
त्याने जिंकली परशुरामांची पसंती
हां हां म्हणता पट्टशिष्याची उपाधी...
अंती कर्णाचं झालं सर्व शिक्षण पूर्ण
गुरुंकडून त्याने घेतले सगळे शिकुन,
युद्ध-कलादी शास्त्रात झाला निपुण...
एक दिवस, गुरु परशुराम कर्णाच्या
मांडीवर डोकं ठेवून झोपले असता,
कर्णाच्या मांडीस वन्य किडा डसला...
त्यामुळे मांडी रक्तबंबाळ झाली होती
गुरुंचा निद्रानाश न व्हावा याचसाठी
सहनशील कर्णाने हूंकींचू केलं नाही...
त्याने गुरुंची झोपमोड होऊ न दिली,
जाग येताच शाप दिला परशुरामांनी ...
विद्वान गुरुंनी त्याची परिक्षा घेतलेली
वास्तविकत: तो "कौंतेय" असल्याचं,
त्यांना आधीपासून पक्कं माहित होतं...
जणू शाप हे त्याचं, विधिलिखित होतं...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
Leave a Reply