कविता – 🌷 ‘ विटंबना ‘

कविता - 🌷 ' विटंबना ‘
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - बुधवार, ५ जानेवारी २०२२
वेळ - रात्री १ वाजून २१ मिनिटे

युगानुयुगे बदलली, काळही बदलला ...
स्थळ-काळ बदलले, स्थिती बदलली ...
विचार बदलले, व्यक्तिमत्त्वंही बदलली ...
पण, स्त्रियांची मानहानी नाही थांबली !

स्त्री मग ती असो रूपवती पांचाली वा,
अग्नि-दिव्य पार करणारी, जानकी वा ...
शूर कुमारी माता-धाडसी शकुंतला वा ...
सत्व परिक्षा देणारी, शापीत अहिल्या !

असो नोकरी करणारी स्त्री अथवा माता ...
पत्नी, भगिनी, गृहिणी वा कोणी पतिता !
असो ती गरीब, श्रीमंत वा सामान्य जनता,
शोषण करत्या दुर्योधनांची नसे कमतरता !

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!