कविता:🌷”विजय-प्राप्ती”


कविता : 🌷 " विजय-प्राप्ती "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

ॐ ऐं -हीम् क्लीम् ब्रह्मचारिण्यै नमः।।
-हीम् श्रीम् अम्बिकायै नमः ।।
दधाना करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा।।

दुसऱ्या जन्मी, ती जगन्माता…
वर्शानुवर्षे घोर तपस्या करता…
तिन्ही लोकी कुतुहुल पसरता…
कोण असेल बरं ही तपस्विता…

पहिल्या वर्षी फक्त फलाहार ग्रहण…
दुसऱ्या वर्षी, फक्त बिल्व-वृक्ष-पर्ण…
तदनंतरची कित्येक वर्षे शुष्क-पर्ण…
मग तिने अजून तीव्रतेने केला"प्रण"

"जोवर स्वतः शिव-शंकर देतील दर्शन,
वर्ज्य सर्वच, फळे-पर्ण-पाणी वा अन्न !"
देवाधिदेव-महादेव स्वयं समाधित मग्नं…
तिन्ही लोक भयभीत, त्यात येईल विघ्नं…

शिव-शंभों जर का कोपले तर काय होईल
या विचारांनी अवघी धरती थरथर कापेल…
देव आणि दानव घाबरून पळतच सुटतील
त्रिनेत्राने डोळा उघडता, भस्मिभूत होतील…

ब्रह्म-तपात लीन होती त्रिभुवन-सुंदरी,…
त्रिकालज्ञानी धरली, रुद्राक्ष-माळ करी…
कमंडलू धरले असे, तिने दुसऱ्या करी…
श्वेत-वस्त्र-परिधान केलेली ही माहेश्वरी…

गौर-वर्णी शोभती, धवल-वस्त्रं…
शांतीदायिनी, तपश्चर्या हे अस्त्रं…
तप-साधनेत रत, न हाती शस्त्रं…
ज्योतीर्मय अंतर्तेज पसरे चतुरस्त्रं…

शोभून दिसे देवी पुष्प-अलंकारांनी...
"ब्रह्म-चारिणी" नाम, धारण करूनी...
सात्विक आहार पवित्र रूपधारिणी,
त्रिलोकी तिज "अपर्णा"म्हणे कोणी...

देवी ब्रह्म-चारिणीची दिव्य-दिप्ती…
तिच्या दर्शने, लाभे-अंतस्थ-शांती…
तिला मनोभावे पूजता, देई तृप्ती…
देवी कृपा होता, विजयाची-प्राप्ती…

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!