कविता : 🌷' विजयाचा डंका '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
शैलपुत्री ॐ देवी शैलपुत्र्यै नमः ।।
या देवी सर्वभूतेषु शैलपुत्री रूपेण संस्थिता। नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:।।
वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्। वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्॥
गणेशोत्सवापाठोपाठ लगेचच नवरात्रीचे वेध सुरू होतात
सर्वपित्री-अमावस्येनंतरच्या पवित्रशा नऊ-रात्री असतात
सर्वात मोठ्या सणांपैकीच एक सण, हे शारदीय नवरात्र
वर्षातून एकूण चार वेळा, पण दोनदा गुप्त असतं नवरात्र
अश्विन महिन्यातील नवरात्र म्हणजेच शारदीय नवरात्री
दुर्गा देवीला समर्पित असलेले हे नऊ दिवस व नऊ रात्री
प्रत्येक दिवशी अर्चना देवीमातेच्या एका शक्ती-रूपाची
देवीच्या साडे-तीन-शक्तिपीठांना वेगळीच महत्व प्राप्ती
प्रतिपदेला मंदिर स्वच्छ करुन गंगाजल शिंपडून शुध्दता
कलश स्थापन करून, पूजा-अर्चा घटस्थापना-प्रसन्नता
कलश स्थापनेनंतर भक्त करती मनोभावे देवीची उपासना
पहिली-माळ अर्पून भाविक करिती शैलपुत्रीची आराधना
देवीच्या नऊ रुपांस प्रसन्न करण्या पूजा-गरबा-कन्यापूजा
दुर्गा सप्तशती स्तोत्र-आरती-व्रतामुळे दु:खांपासून मुक्तता
अखंड नऊ दिवस-नऊ रात्री तुंबळ रण-संग्राम दानवांबरोबर
घनघोर युध्दात दुर्गारूपामध्ये देवीने वधिला दुष्ट-महिषासुर
तिन्ही लोकी त्राही माजविणा-या दानवांचे समूळ निराकरण
तेंव्हापासून“महिषासुरमर्दिनी”हे देवीमातेचे नवीन-नामकरण
नवरात्री उत्सवाने चांगल्याचा, वाईट-प्रवृत्तींवर विजय सिध्द
त्या जयाचा डंका वाजविण्या, विजयादशमीचा सण प्रसिद्ध
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply