कविता -🌷 "वाल्मिकी-रामायण मना-मनांत"
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - रविवार, २२ जानेवारी २०१७
वेळ - दुपारी १२ वाजता
विपरीत"रामनाम-मरा-मरा"सुध्दा नाश करी पापांचा
नवजन्म झाला-प्रगल्भ-बुद्धीच्या वाल्मिकी-ऋषींचा
वाटमारी-करूनही-वाल्या-कोळी जणू पूर्णतः तरला
रुपांतरीत स्वरुपात तारण्यासी सर्व मनुष्य योनीला
"रामायण"सारखी एकमेव-द्वितीय-वाङ्मय-रचना
निर्माण करुन उपकृत केले, संपूर्ण मानवी जगाला
जोवर पृथ्वीतलावर मनुष्य-जीवन आहे अस्तित्वात
तोपर्यंत महर्षी वाल्मिकी व त्यांचा रामायण हा ग्रंथ,
या दोहोंचं विस्मरण कुणा होणं केवळ अशक्यप्राय
कारण ती-कथा सदा-सर्वदा-वारंवार घडंत राहणार
संदर्भ-नावं-पात्रं-स्थळं-भूमिका खचितच बदलणार
काळाच्या-कसोटीवर भक्कमपणे चिरंतन टिकणार
मूळ-कथानक, विस्तार तथा अंत हे त्रिकालाबाधित
एक-अद्भुत-सत्य ज्यास मृत्यूही नाही शिवू शकत !
"वाल्मिकी-रामायण"सदा जिवंत राहील मना-मनात
कायम-स्वरूपात आजन्म, प्रत्येक माणसा-माणसात
जोपर्यंत आहेत आभाळात चंद्र-सूर्य-तारका झळकत
या-महान-रचनेला प्रयत्नांतीही विसरू नाही शकंत !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply