कविता - 🌷 " वारी "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
चौऱ्याऐंशी लक्ष योनींच्या सततच्या प्रवासानंतरी...
शेवटी नशीबाने एकदा मनुष्य-जन्म-मिळाल्यावरी...
विचार-पूर्वक खर्च करू आयुष्य-लावून-सत्कारणी
अशी एकमेव-सुवर्ण-संधी मिळणार नाही वरचेवरी...
युगानु-युगें विठ्ठल-रखुमाबाई उभेच आहेत विटेवरी...
भक्तांच्या हाकेला येतात धावून, कर ठेवून कटेवरी...
वारक-यांचा जणू"समुद्र" येतो चंद्रभागेच्या किनारी...
"जय जय राम-कृष्ण-हरी" गजर दुमदुमतो पंढरपुरी...
एखाद्याचीच मानस-वारी, बाकीच्यांची शारिरीक-वारी
तीर्थक्षेत्राची वारी म्हणजे, आयुष्यभराची पुण्य-कमाई
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆
Leave a Reply