कविता : 🌷 " वात्सल्याला नसे निर्बंध "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
आई आणि मुलगा-वा-मुलगी,
शब्दां-पलीकडचीच ही नाती...
नऊ-महीने गर्भावस्थेत आई,
रात्रंदिन संस्कार करी गर्भावरी...
असो लाडाचा मुलगा वा लेक
प्रेम तसूभरानेही, कमी नसेल
माया, आभाळा-एव्हढी उदंड...
उभ्या आयुष्यात न पडेल खंड...
मुला-मुलीला दुखता-खुपता,
मातृ-पितृ-हृदय जखमी होता...
जखम वाहो-न-वाहो-भळभळ,
मातृ-नेत्र वाहती अश्रू घळघळ...
घासामधील घास, काढून ठेवी...
चातकासम तासंतास वाट पाही...
दरेकाची आवडनिवड सांभाळी,
मातृत्वाची भूक असे जगावेगळी...
मुला-मुलीची हौस-मौज पुरवी,
सढळ हस्ते लाड-कौतुक करी...
स्वतःवर काटकसरीने खर्च करी,
वडिलांच्या प्रेमाची रीतच न्यारी...
मुलं-मुली किती मोठे झाले तरी,
प्रसंगी मन चिंती ते न चिंती वैरी...
काळजात कालवाकालव अखंड...
वात्सल्याला नसे कसलाच निर्बंध...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply