कविता : 🌷’ लाडकी लेक ‘


कविता : 🌷' लाडकी लेक '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

जगभरात सर्वत्रच उत्साह ओसंडून वाहतो
जागतिक कन्या-दिन साजरा केला जातो
समाजात मुलींना, मुलांसम स्थान मिळावे
सर्वच क्षेत्रात मुलींचे स्वागत-कौतुक व्हावे

आई-वडील आणि त्यांची लाडकी लेक,
हे नातं इतकं अलौकिक-नाजुक-मधाळ
बाहुलीला कडेवर घेऊन जणू आई बनून
परत-करणार धमाल-दंगा-मस्ती खट्याळ

सगळं काही करून-सवरूनही नामानिराळी
निष्पाप भाबडं रूप पाहून, फसतात सगळी
अभ्यासाच्या वेळी मन लावून अभ्यास करी,
नंतर रमणार बाईसाहेब खेळताना भातुकली

कधी कोणी रागावले तर गोबरे गाल फुगवून
गुपचुप कोप-यांत जाऊन लपून-छपून बसते
मग खूपच बाबा-पोता करून लाड-कौतुकाने
स्वारी परत हसायला-खिदळायलाही लागते

काही झालं तरी तिच्यावर रागावता येत नाही
मोठ्या टपो-या डोळ्यांनीच आर्जव करून ती
गालावर गाल घासून इवल्या हातांनीच मिठी
मग खोटानाटा राग सुध्दा लांबवर पळ काढी

🌷@ तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!