कविता - 🌷" लाडका सोमदेव "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
को जागर्ति ? ॐ सोम सोमाय नम: ।।
या निशा सर्वभूतानां तस्या जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनै: ।।
कोजागिरी पौर्णिमेचा हर्ष होई, द्विगुणित
गगनी दिसता चंद्रमा-सह-तारका-अगणित...
जसा गोपींच्या गराड्यात, श्रीकृष्ण रमतो
तसा असंख्य चांदण्यांमध्ये चंद्रही शोभतो...
सर्वच प्रेमिकांचा अत्यंत असे हा लाडका
त्याच्या साक्षीनेच सर्व घेतात आणाभाका...
आकाशातून शांतपणे आनंद देत असतो
पाहताक्षणीच जणू नजर खिळवून ठेवतो...
नभी-काळ्या-कॅनव्हासवर, उठूनच दिसतो
पौर्णिमेला पूर्णाकार घेऊन, तेजपुंज होतो...
द्वितीयेची सुरेख सुंदर अशी चंद्राची कोर
जिला पाहून तरुणींचा नाचू लागे मनमोर...
तरुण-मुली म्हणून कोरतात चंद्रकोर भाळी
सौंदर्यात पडे भर,गाली लज्जेची चढे लाली...
सगळे "चार चांद लग गये"असं म्हणतात...
त्या शांत-शितल स्वरूपावर, सारे भाळतात...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply