कविता - 🌷" लाडका सोमदेव "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - २४ ऑक्टोबर २०१६
सर्वच प्रेमिकांचा अत्यंत असे लाडका
त्याच्या साक्षीने सर्व घेती आणाभाका
आकाशात शांतपणे आनंद देत असतो
तोही स्वतः अधिक आनंदी होत राहतो ...
जसा गोपींच्या गराड्यात-श्रीकृष्ण रमतो
तसा अगणित चांदण्यांमध्ये चंद्र शोभतो ...
गर्द-काळ्या-कॅनव्हासवर, उठून दिसतो
पौर्णिमेला पूर्णाकार घेऊन तेजपुंज होतो
द्वितीयेची खूप सुरेख अशी चंद्राची-कोर
जिला बघून तरुणींचा नाचू लागे मनमोर ...
म्हणून तरुणी भाळी कोरतात ती चंद्रकोर ...
त्यामुळे त्यांच्या सौंदर्यात अजून पडते भर ...
सगळे"चार चांद लग गये"असे म्हणतात ...
सर्वच त्या शांत-शितल रूपावर भाळतात ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply