कविता : 🌷” लाखात एक भाऊ “


कविता : 🌷" लाखात एक भाऊ "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले        
                                                 
माझ्यापेक्षा मोठा पण सर्व भावांमध्ये लहान असा
तो शिस्तप्रिय-हुशार त्यावर सर्वांचाच पूर्ण भरवसा

सतेज गौर वर्ण, बांधेसूद यष्टी-नाक-डोळे धारदार
बुध्दिमान इतका की बुद्धिबळात, हरवून करी गार

तो घरीच शांतारामच्या गिरणीचा, सुरु करीतसे पट्टा
त्याच्या मग्न होऊन खेळण्याची, भाऊ करायचे थट्टा

मी भातुकली खेळायची-त्याची सुरु व्हायची गिरणी
खोटं-खोटं-पीठ-दळून-दळून अंती होई दिवे-लागणी

मिरजेत आम्हां भाऊ-बहिणीचं विशेष गुपितच होतं
टारझनसारखं जंगलात राहायचं, लपायचं-छपायचं

त्यासाठी छोट्या पत्र्याच्या बॅगेत टाॅर्च पासून मेणबत्ती
दोरखंड-पैसे-कपडे-फळं कापायची छोटी सुरी-कात्री

सुकामेवा, शेंगा व खूप साऱ्या गोष्टींचा भरणाच होता
गुपचूप रोज ती बॅग-व-सामान तपासणं हा छंद होता

तो स्वभावाने साधा-सरळ-खूप-समजूतदार-लाघवी
मनातलं-स्पष्ट-बोलणं-याउप्पर-आतबाहेर-काहीनाही

सगळ्या खेळात रूची-पण आवडता खेळ बुध्दिबळ
समोर कोणीही असो-त्यास हरवणं-असे हातचा मळ

गोरेगावमध्ये व डोंबिवलीत आईचं वास्तव्य लामूकडे
त्यामुळे माहेर म्हणून आपसूक ओढा नेहमी  तिकडे

लामूला साजेशी अर्धांगिनी, वैशालीच्या रुपात लाभली
तिने आईची-काळजी-घेत हसून-बोलून मनंही जिंकली

मुंबई-आंतर्महाविद्यालय-बुध्दिबळ-स्पर्धेत-सहभागी
पदव्युत्तर-अभ्यास-क्रम-पूर्ण-करुनही-झाला-यशस्वी 

श्रद्धा असूनही अंधश्रद्धा-अवास्तव-स्तोम पटत नाही
प्रत्येक गोष्टीची, बुध्दिच्या निकषावर निक्षून तपासणी

निसर्ग-सान्निध्यात देश-विदेशीच्या पर्यटनाची शिदोरी
प्रवासांची-तपशीलवार-छान-प्रवास-वर्णनंही लिहीली

कैलास-मानसरोवर-यात्रा-परिक्रमा पूर्ण यशस्वी केली
पवित्र जल-रूद्राक्ष आणले माझ्यासकट सगळ्यांसाठी

सदा सर्वदा कामात-वाचनात-लिखाणात असतो दंग
योगाभ्यास-मित्रांचा-अध्यात्मिक-ज्ञानाचा-दांडगा व्यासंग

कुणा हवी ती मदत-न सांगताही, समजून करतो लामू
मनस्वी-मनकवडा-उमदा-असा-आहे, लाखात-एक-भाऊ

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!