कविता - 🌷 “ लपंडाव " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
श्रावणात जसा ऊन-पावसाचा, लपंडाव, लाटांवर हेलकावे खातच चाललेली नाव लहर लागेल तसा जणू सापशिडीचा डाव कधी काय होईल, अनुमानाला नाही वाव...
कधी अचानक मधाळ सुखाचाच सोहळा तर कधी दाहक अंतर्बाह्य पोळून टाकणारा कल्पनातीत महाभयंकर जीवघेणा चटका! सगळे भोग-भोगल्या-शिवाय नाही सुटका
अंतर्गत स्व-आनंद-स्रोताचा आपलाच झरा कशाला दुसर्या-कुणावर-अवलंबून असावा? एरवीचं कणखर-मन इतकं-हळवं का व्हावं? सकृतदर्शनी विनाकारण-असं-का कोमेजावं?
सदैव बदलत राहणं हा आहे निसर्गाचा नियम "बदल" सोडून, जगात सर्वकाही बदलत जातं पण सृष्टी-चक्राचे-नियम मात्र, राहतात कायम ! सगळं पचवून मजेत जगण्याचं हे अवघड कर्म !
Leave a Reply