कविता – 🌷 ” लख्ख उजेड “


कविता - 🌷 " लख्ख उजेड "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

मागे वळून पाहता, आठवले त्यांचे शब्द-न्-शब्द
तेंव्हा कळलंच नव्हतं की जे कथिलं, होतं प्रारब्ध...

आज प्रत्येक क्षणी जाणवतं, ते होतं सत्य-वचन
पूर्व-सूचना मिळूनही निर्बुद्धपणाने, दुर्लक्ष करणं...

तारुण्याचा कैफ-स्वभविष्यावर फाजील भरवसा
धोक्याचा इशारा गांभीर्याने घेतलाच नाही फारसा...

होऊन-होऊन काय होणार ज्यावर ताबाच नसेल,
बुद्धिनिष्ठ विचारांतीही अस्पष्टच होतं, काय घडेल...

अपरिपक्वतेमुळे विचारांची झेपही होती, अर्धवट...
त्यामुळे"वाईटाची"परिभाषाही होती अंधुक-अस्पष्ट...

"ज्याच्या वंशा जावे, तेंव्हा ते कळे" या म्हणीप्रमाणे,
सर्व यथोचित असूनही, का होते जगणे केविलवाणे ?

कळत असून वळत नाही, गप्प बसून बघवत नाही
त्रयस्थपणाने अलिप्त राहणे, स्वभावात बसत नाही

अमावस्ये नंतर, चंद्राच्या कला वाढून येतेच पौर्णिमा...
हे ग्रहणही सुटून, लख्ख उजेडच पडणार आहे पुन्हा...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!