कविता – 🌷 ‘ लक्ष्मी-नारायण ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – बुधवार, ३१ जानेवारी २०२४
वेळ – रात्रीचे १० वाजून ३९ मि.
पतीच्या असण्याने घराला घरपण मिळते …
त्यामुळेच नव्या दमाची नवीन-पिढी होते …
तक्रारही न करता तो नोकरी-धंदा करतो …
सर्वांसाठी मुक्त हस्ताने पैसेही खर्च करतो …
घरी कुणी आजारी असता, काळजी घेतो …
न सांगता-सवरताच सगळं समजून करतो …
एरव्ही थोडासा सैलढैल असलाही जरी तो,
पाहुणे असताना शहाण्यासारखाच वागतो …
घरातल्यांना फिरायला न्हेऊन-लाड पुरवतो …
नाटक-सिनेमा-खवैयेगिरी सगळंच जमवतो …
प्रत्येक वाढदिवस दणक्यात साजरा करतो …
सहल-परदेश-वारी-आदी योजनाही आखतो …
स्वारी खुशीत असताना, फुले-गजरे आणतो …
कठीण प्रसंग आला, ठाम भूमिका निभावतो …
पत्नी गृह-लक्ष्मी म्हणून मानली-तिला साजेसा …
पति-परमेश्वर-नारायण, हा जणू तिला शोभेसा …
सगुण असल्यावर एखादा दुर्गुणही असणारच …
सर्व-गुण-संपन्न-व्यक्ती मिळणं, हे दिवास्वप्नच …
लग्नाच्या-गाठी, त्या देवानंच बांधलेल्या असतात …
प्रत्येक पति-पत्नी जणू लक्ष्मी-नारायण-स्वरुपात …
अखेरीस काय-संसार-रथ उत्तमपणे हाकण्यासाठी …
लक्ष्मी आणि नारायण, दोघेही-आवश्यक त्यासाठी …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply